रामगीतांनी सज्जनगडची संध्याकाळ मोहरली

दि.19 फेब्रुवारी ओंकार प्रभू घाटे आणि संपदा माने यांचे गायन, सुप्रसिद्ध कीर्तनकार मकरंदबुवा रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन

सातारा : सज्जनगड येथे सध्या सुरू असलेल्या दास नवमी महोत्सवांतर्गत श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने विविध मान्यवर गायक वादकांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. याच कार्यक्रमात धनंजय मस्कर आणि केतकी चैतन्य यांनी सादर केलेल्या राम गीतांनी कार्यक्रमात मोठी उंची गाठली.

विघ्नहर्ता गणरायाचे.. गणपती गणराज धुंडीराज महाराज.. या गीताने आपल्या गायन कार्यक्रमाला सुरुवात करत या दोन्ही गायकांनी त्यानंतर प्रभू श्री रामचंद्र वर रचलेली.. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा.., राम सावळा सुंदर.. सादर करीत.. पांडुरंग नामी.. हा अभंग आळवला त्यानंतर.. रूप रामाचे पाहू चला हो.., पायोजी मैंने राम रतन धन पायो..जय जय राम.. असे सर्वांना सांगत.. पतीत पावना जानकी जीवना.. मुरलीधर शाम.. पद्मनाभा नारायणा.. या गीताच्या सादरीकरणाने आपल्या गायन साधनेची उंची उपस्थित यांना दाखवून दिली. त्यानंतर ध्यान लागले रामाचे.. सादर होत.. संहारुनी अरी रघुकुल दीपक.. आणि त्यानंतर रामनामाचा जयघोष असणारे.. श्री राम जय राम जय जय राम.. या पदाने या रंगलेल्या गायन सेवेची सांगता झाली. या गायकांना तबला साथ रूपक वझे यांनी केली, तर ऑर्गन साथ सुशील गद्रे यांची होती. व्हायोलीन वर उदय गोखले आणि पखवाजावर प्रथमेश तारळकर यांनी साथ केली.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा मोडक यांनी केले. या सर्व गायक वादकांचा सत्कार श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने विलासराव ताम्हणकर, सौ. रसिका ताम्हणकर, गुरुनाथ महाराज कोटणीस यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष ह, , प. गुरुनाथ महाराज कोटणीस, सज्जनगड मासिकाचे संपादक अजित कुलकर्णी, ,विद्याधर बुवा वैशंपायन, शेखर बुवा रामदासी व विविध क्षेत्रातील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 दिनांक 19 फेब्रुवारी बुधवारी या महोत्सवात सायंकाळी ओंकार प्रभू घाटे आणि संपदा माने यांचे गायन सादर होणार आहे त्यापूर्वी सायंकाळी चार ते सहा या वेळेत समर्थ भक्त आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार मकरंद बुवा रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.



मागील बातमी
जिल्ह्यात राष्ट्रवादी चा स्वबळा चा नारा
पुढील बातमी
जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्सवी माहोल

संबंधित बातम्या