श्री. छ. शाहू महाराज (थोरले) यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन; मावळा फाउंडेशनचा उपक्रम, संगम माहुली येथे अभिवादन कार्यक्रम

by Team Satara Today | published on : 13 December 2025


सातारा :  स्वराज्यविस्तारक श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या २७६ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तसेच, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मावळा फौंडेशनच्यावतीने सोमवारी (दि.१५) सकाळी साडे आठ वाजता संगममाहुली (ता. सातारा) येथे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.

हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपंातर करणारे चौथे छत्रपती व सातारा नगरीचे संस्थापक, स्वराज्यविस्तारक श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 

प्रतीवर्षा प्रमाणे यावर्षीही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या पुण्यतिथीचे २७६ वे वर्ष असून येथील मावळा फौंडेशनच्यावतीने यंदाही पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१५) सकाळी साडे आठ वाजता संगममाहुली येथील स्मारक परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमास समस्त शाहूनगरवासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मावळा फौंडेशन, जनता सहकारी बॅंक, सातारा, ग्रामपंचयात संगममाहुली तसेच, जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुका पोलिसांचा शिवथर गावच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा
पुढील बातमी
साताऱ्यात धर्म, भाषा व प्रांत यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन ; उत्तर प्रदेशातील तरुणावर खिदमत-ए-खलककडून हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार

संबंधित बातम्या