शिवाजी राजे भोसले चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा ; स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

by Team Satara Today | published on : 01 November 2025


मुंबई : कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थगितीची मागणी करणाऱ्या एव्हरेस्ट इंटरटेन्मेंट एलएलपीला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.

2009 साली महेश मांजरेकर यांच्या अश्वमी फिल्म्ससोबत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाची सहनिर्मिती करणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने आधीच्या चित्रपटाच्या शीर्षक आणि पटकथेवर विशेष कॉपीराइट असल्याचा दावा केला होता. 2013 साली, कंपनीने चित्रपटाचे पूर्ण हक्क मिळवले आणि नंतर महेश मांजरेकर हे त्याचा सिक्वेल काढणार असल्याचे दिसून आले. कंपनीने आरोप केला आहे की पुन्हा शिवाजी राजे भोसले चित्रपटासाठी पटकथा, कथानकाची रचना आणि संवादांचे बरेच भाग कॉपी केले आहेत. या याचिकेवर सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या समोर सुनावणी झाली. महेश मांजरेकर यांनी चित्रपटासाठी पूर्णपणे नव्याने काम केले असून एव्हरेस्टच्या चित्रपटाचे त्यात अनुकरण दिसत नाही. त्यामुळे या दाव्यात कोणतेही तथ्य नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहे जी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेची मक्तेदारी असू शकत नाही असे अशा शब्दात याचिकाकर्त्यांना फटकारत स्थगितीची मागणी फेटाळून लावली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रोहित आर्यच्या संस्थेने शाळांकडून परस्पर आकारले शुल्क; शालेय शिक्षण विभागाकडून खुलासा
पुढील बातमी
तुटपुंज्या मनुष्यबळावर वेतन व भविष्य पथकाचा गतिमान कारभार

संबंधित बातम्या