सातारा : गोडोली, सातारा येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडोली, ता. सातारा येथील यशोदा शाळेच्या शेजारी असलेल्या गंगोत्री गृहसंकुल अपार्टमेंट खाली पार्क केलेली 20 हजार रुपये किंमतीची बजाज डिस्कव्हर दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद प्रिंटींग प्रेस व्यावसायिक अनिल अनंत गांधी (वय 52) यांनी नोंदवली आहे. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.