खोडशीतील अपघातात कारचालकासह महिला किरकोळ जखमी

कराड : महामार्गाचे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पडलेल्या वाळूवरून घसरून मोटार रस्ता दुभाजकाला धडकून उलटली. त्यात कारचालकासह महिला किरकोळ जखमी झाली. मात्र, अपघातात मोटारीचे नुकसान झाले आहे. पोलिसात याबाबत तक्रार दिलेली नाही.

मोटार कोल्हापूरकडे जात असताना खोडशी येथे दुपारी बाराच्या सुमारास अपघात झाला. डॉ. श्रेया पारखे (रा. महाड) व कारचालक महादेव नगरकर (रा. महाड) अशी जखमींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डॉ. पारखे या कौटुंबिक कार्यक्रमासाठी सकाळी सातच्या सुमारास महाड येथून कोल्हापूरकडे निघाले होते. खोडशी येथे महामार्गाचे काम चालू होते. चालकाच्या ते लक्षात न आल्याने अचानक चालकाने ब्रेक लावला. मोटारीचा वेग असल्याने ती घसरत दुभाजकावर आदळली.

त्यातील डॉ. श्रेया यांच्यासह चालक किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याच्या अपघात विभागासह महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोचले. त्यांनी मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

मागील बातमी
पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता
पुढील बातमी
भारताच्या लेकींनी सलग दुसऱ्यांदा जिंकला १९ वर्षांखालील विश्वचषक

संबंधित बातम्या