खासगी सावकारी प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 30 August 2026


सातारा : खासगी सावकारी प्रकरणी सहा जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी योगेश अशोक सुतार राहणार शाहूपुरी सातारा यांनी 19 जानेवारी 2024 ते 25 ऑगस्ट 2026 दरम्यान मसाल्याच्या व्यवसायासाठी सुरेश सावंत रा. शाहूपुरी सातारा, अक्षय दळवी, रोहित दळवी दोघेही (रा. परळी ता. सातारा), अमित शिंदे (रा. झरेवाडी ता. कोरेगाव), दत्तात्रय जगताप (रा. भोंदवडे, ता. सातारा) आणि सागर गोळे (रा. जकातवाडी, ता. सातारा) यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते हे पैसे त्यांनी व्याजासह परत करू नये संबंधितांनी अधिक व्याज द्यावे लागेल मुद्दल अजून बाकी आहे, असे योगेश सुतार यांना फोनवरून सांगून तसेच समक्ष शिवीगाळ, दमदाटी केली आहे.

याप्रकरणी संबंधितांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार घोडके करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता
पुढील बातमी
एकास मारहाण प्रकरणी महिलेसह दोन जणांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या