सातारा : मुलगा-मुलीसह राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील राहत्या घरातून एक विवाहिता दि. 10 रोजी मुलीच्या पालक बैठकीसाठी करंजे येथील कन्या विद्यालयात जाते, असे सांगून निघून गेली आहे. ती 9 वर्षीय मुलगी, 4 वर्षीय मुलाला घेवून कोणास काहीही न सांगता कोठेतरी निघून गेली आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. सहायक फौजदार माने तपास करत आहेत.