सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीतर्फे सोमवार दि.१४ रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पाटण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वा.ध्वजवंदन व सुत्रपठन स्मारक येथे सरपंच मयुरी चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी मधुकर गायकवाड (तात्या) व यशवंत दाभाडे (आबा) उपस्थीत राहणार आहेत.विधी संचलन भारतीय बौद्ध महासभेतर्फे बौद्धाचार्य करणार आहेत.१०।। वा. शुभेच्छापर मनोगत,दुपारी १२ वा.जाहीर सभा,पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांचा जाहीर सत्कार व त्यांचे मनोगत होणार आहे. अध्यक्षस्थान सचिन कांबळे भूषवणार आहेत.स्वागताध्यक्ष प्रा. रवींद्र सोनावले व कार्याध्यक्ष म्हणून मिलिंद कांबळे आहेत. यावेळी नगराध्यक्षा अनिता शशिकांत देवकांत, आबासाहेब भोळे, प्राणलाल माने, बाळासाहेब जगताप, भीमराव दाभाडे, आप्पासाहेब मगरे,सिताराम सपकाळ, आनंदा गुजर, संजय जाधव, विजयराव थोरवडे, राहुल रोकडे, संतोष रोकडे, बापूराव जाधव, बाळासो पारील,भानुदास सावन्त,सुनील माने,अनिल वीर व सिद्धार्थ सपकाळ उपस्थीत राहणार आहेत.दुपारी २ वा.भोजनदान,३ वा.शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन आहे.तेव्हा ओंकार बेंजो ग्रुप, शिवडे (कराड) यांचे खास आकर्षण आहे.सायंकाळी ६ वा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सांगता समारंभ होणार आहे.तेव्हा सर्वांनी वेळेवर उपस्थीत रहावे. असे आवाहन समितीच्या तालुका ग्रामीणतर्फे सचिव आत्माराम माने,उपाध्यक्ष शंकर शिंदे,कोशाध्यक्ष रूपेश सावंत व उपाध्यक्ष बळीराम गायकवाड यांनी केले आहे.