अनोळखी बेवारस मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 12 August 2024


सातारा : सातारा तालुका हद्दीत एक बेवारस मृतदेह सापडला असून त्याबाबतची ओळख पटवण्याचे आवाहन सातारा तालुका पोलिसांनी केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 4 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वर्ये, ता. सातारा गावच्या हद्दीतील हॉटेल मानस व हॉटेल जगदंब नजीक असलेल्या सर्व्हिस रोडवर साचलेल्या पाण्यात अनोळखी पुरुष जातीचे अंदाजे 50 वर्षे वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या अंगावर शर्ट नसून काळ्या रंगाची पॅन्ट, काळी पांढरी मिशी व दाढी आहे. संबंधित इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास त्याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. मोरडे यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातातील जखमीचा मृत्यू 
पुढील बातमी
इतर मागास बहुजन कल्याण विभागासाठी तालुकास्तरीय मेळाव्यांचे आयोजन

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी