कूपर कॉर्पोरेशनचा सीएसआरमधून सातारा नगरपरिषदेला ट्रॅक्टर प्रदान ; लोकार्पणाचा कार्यक्रम उत्साहात, स्वच्छता व हरित उपक्रमांना मिळणार चालना

by Team Satara Today | published on : 16 April 2026


सातारा : शहरातील स्वच्छता आणि हरित विकासकामांना गती देण्यासाठी कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि., सातारा यांनी आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत सातारा नगरपरिषदेला ट्रॅक्टर प्रदान केला. या ट्रॅक्टरच्या लोकार्पणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कंपनीचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर फरोख कूपर व डायरेक्टर जाल कूपर यांच्या हस्ते नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर यांच्याकडे ट्रॅक्टरची चावी सुपूर्द करण्यात आली. यावेळी ट्रॅक्टरचे पूजन नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर यांनी फरोख कूपर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कूपर कॉर्पोरेशनच्या वतीनेही नगरपरिषद पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

मनोगतात बोलताना नगराध्यक्ष मोहिते म्हणाले की, कूपर कॉर्पोरेशनने साताऱ्याच्या विकासासाठी सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत योगदान दिले असून, शहराला गरज भासल्यास कंपनी नेहमी पुढाकार घेते.

याप्रसंगी कूपर कॉर्पोरेशनचे डायरेक्टर असलम फरास, आर्थिक दुर्बल घटक समितीचे सभापती संकेत साठे, नगरपरिषदेचे वृक्ष विभाग प्रमुख दिग्विजय गाढवे तसेच कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सीएसआर अंतर्गत मिळालेला हा ट्रॅक्टर शहरातील झाडांना पाणी देणे, रोड डिव्हायडरमधील वृक्षांची देखभाल आणि स्वच्छता कामांसाठी उपयुक्त ठरणार असून, त्यामुळे नगरपरिषदेच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा नगरपरिषदेकडून धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारतींबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन
पुढील बातमी
कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शेंद्रे येथे आले पीक परिसंवाद उत्साहात; लागवडीबाबत सविस्तर मार्गदर्शन

संबंधित बातम्या