सातारा जिल्ह्यात तब्बल 14 केंद्रांवर रोजगाराची दारे खुली; युवक-युवतींसाठी 29 सप्टेंबरला रोजगार महाकुंभ

by Team Satara Today | published on : 15 September 2026


सातारा : नोकरीच्या शोधात असलेल्या जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी 29 सप्टेंबर हा दिवस रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावित्र्नयता विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत सातारा जिल्ह्यात तब्बल 14 ठिकाणी एकाच दिवशी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह घेण्यात येणार आहेत. विविध कंपन्या, उद्योग, आस्थापना आणि रोजगारदात्यांकडून उपलब्ध होणार्‍या रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
बेरोजगार युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तसेच कौशल्य आणि आवडीनुसार रोजगाराच्या संधी मिळाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. रोजगाराबरोबरच स्वयंरोजगार, कौशल्यविकास आणि उद्योजकतेच्या संधींची माहितीही युवकांना या माध्यमातून मिळणार आहे. राज्यभर एकाच दिवशी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटीआय, तंत्रनिकेतन तसेच विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेले तरुण-तरुणी यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. रोजगाराच्या अपेक्षेने अनेक युवक विविध ठिकाणी नोकरीच्या संधी शोधत असतात. त्यांना एकाच व्यासपीठावर अनेक कंपत्र्नयांशी थेट संवाद साधण्याची संधी या महाकुंभामुळे उपलब्ध होणार आहे.
या ठिकाणी होणार मेळावे
कराड येथील डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, यशवंतराव चव्हाण शासकीय कृषी महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन; शेंद्रे येथील अभयसिंहराजे भोसले इत्र्निस्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक व छत्रपती शाहू औद्योगिक प्रशिक्षण संस्था; पाटण येथील कै. सौ. वत्सलादेवी देसाई शासकीय आयटीआय; राजमाची येथील दादासाहेब मोकाशी प्रायव्हेट आयटीआय; तसेच वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक येथे मेळावे होणार आहेत.सातारा शहरातील मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन (मास भवन), एमआयडीसी, यशोदा टेक्निकल कॅम्पस, पाटील इलेक्ट्रॉनिक्स इत्र्निस्टट्यूट, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, फलटण येथील मुधोजी महाविद्यालय आणि कोरेगाव येथील दर्पण कॉम्प्युटर इस्टिस्टट्यूट येथेही रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील उद्योग, कंपन्या, लघुउद्योग व आस्थापनांनी त्यांच्या रिक्त पदांची नोंदणी करून उपक्रमात सहभागी व्हावे, असेही प्रशासनाने आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी 02162-239938 या क्रमांकावर संपर्क साधावा.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रतापगडावरील अफझल खान कबरीच्या सभोवतालच्या 300 मीटर परिसरात कलम 163 लागू; पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी
पुढील बातमी
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या चूलत बंधूंचे निधन

संबंधित बातम्या