यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व ना. श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा सेंटरचे कौतुक केले. तसेच सातारा सारख्या छोट्या शहारात रचना सारख्या भव्य वास्तू प्रदर्शनाचे आयोजन करून सातारा सेंटरने देशभर नावलौकीक मिळवल्याबद्दल सातारा सेंटरचा गौरव केला. यावेळी खा.श्री.छ. उदयनराजे भोसले व ना. श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यापुढील काळात सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आपण भरीव योगदान देणार असल्याचे सांगतच बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून अनेक प्रकल्प सातारा जिल्ह्यात आणण्याचे वचन दिले.
यावेळी बोलताना बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष सुधीर ठोके म्हणाले, सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपुर्ण पश्चिम महाराष्ट्राला भूषणावह ठरेल, असे रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य मंडप, आकर्षक प्रवेशद्वार, लाईट सिसटीम्स्, आकर्षक स्टॉल्स असे या प्रदर्शनाचे भव्य दिव्य आयोजन आहे. रचनाच्या यशस्वी आयोजनाचे हे तेरावे वर्ष आहे. लोकांकडूनही या उपक्रमाला वाढता प्रतिसाद आहे. प्रदर्शनास भेट देणार्यांची संख्याही दरवेळी वाढत आहे. यावेळी सुमारे चार लाखापेक्षा जास्त नागरिक भेट देतील व सुमारे 120 कोटींपेक्षा जास्त उलाढाल रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 मध्ये होईल, ही अपेक्षा आहे.
यावेळी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने ना. श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सन्मानचिन्ह, बुके देऊन असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर ठोके यांनी, तर आनंद गुप्ता यांचा सत्कार सेक्रेटरी हर्षद वालावलकर, अनिल सोनवणे यांचा सत्कार खजिनदार पृथ्वीराज पाटील यांनी व अन्य मान्यवरांचा सत्कार उपाध्यक्ष सयाजी भोसले व पदाधिकारी यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन साहिल शेख यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सेक्रेटरी हर्षद वालवलकर यांनी केले. यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांनी रचना प्रदर्शनातील सर्व स्टॉल्सची पहाणी करून माहिती घेतली. उद्घाटन समारंभास बिल्डर्स असोसिएशनच्या मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, बारामती, इचलकरंजी, फलटण, पंढरपूर व अन्य शहरातील पदाधिकारी, सातारा सेंटरचे सर्व पदाधिकारी, बिल्डर्स असोसिएशच्या महिला विंग स्फूर्तीच्या सर्व सदस्य व कुटुंबिय मोठया संख्येने उपस्थित होते.
रचना 2024 प्रदर्शन हे जिल्हा परिषद मैदानावर दि. 26 ते 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत आयोजित केले असून प्रवेश विनामुल्य आहे. या प्रदर्शनास सर्वांनी सहकुटुंब आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेतर्फे करण्यात आले आहे.