केसांच्या निरोगी आरोग्यासाठी करा घरगुती हेअर सिरम

by Team Satara Today | published on : 25 April 2025


उन्हाळा ऋतू अखेर सुरु झाला आहे. उन्हाळ्यात अनेक समस्या अनेकदा त्रासाचे कारण बनतात. या ऋतूत आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या उद्भवत असतात. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्यासोबतच केसांचीही विशेष काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यात, घामामुळे केस अनेकदा तेलकट होतात. इतकेच नाही तर अनेक वेळा धूळ आणि घाणीमुळे केस निर्जीव देखील होतात.

आपले केस आपल्या सौंदर्याचा एक मुख्य भाग आहेत, अशात त्यांची वेळोवेळी काळजी घेणे फार गरजेचे आहे. केसांच्या निरोगी आरोग्यासाठी अनेकजण बाजारातील महागड्या रासायनिक पदार्थांचा वापर करतात मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्हाला बाजारातील महागड्या प्रोडक्ट्सवर पैसे खर्च करण्याची खरंतर काहीच गरज नाही. तुम्ही घरीच काही सोप्या उपायांची तुमच्या केसांची काळजी राखू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला काही घरगुती हेअर सिरमच्या रेसिपीज सांगणार आहोत. हे हेअर सिरम तुमचे केस नैसर्गिकरित्या मऊ आणि चमकदार बनवतील.

मध आणि दह्याचा हेअर सिरम

फार पूर्वीपासून केसांसाठी मधाचा आणि दह्याचा वापर केला जात आहे. यामधील मॉइश्चरायझिंग गुणधर्म, तुमच्या केसांना मऊ आणि पोषण देण्यास मदत करतात. या हेअर सिरमसाठी सर्वप्रथम १ टेबलस्पून मध २ टेबलस्पून साध्या दह्यात मिसळा. आता हे मिश्रण तुमच्या केसांना लावा. नंतर, ते २०-३० मिनिटे याला केसांवर तसेच राहूद्या आणि मग केस शॅम्पूने स्वछ धुवून काढा.

कोरफड सिरम

कोरफडीमध्ये हायड्रेटिंग गुणधर्म असतात, जे तुमचे केस मऊ करण्यास मदत करू शकतात. याचा हेअर सिरम तयार करण्यासाठी सर्वप्रथम २ टेबलस्पून ताजे कोरफड जेल, १ टेबलस्पून जोजोबा तेलात मिसळा. आता हे मिश्रण ओल्या केसांना मुळांपासून टोकांपर्यंत लावा. ३० मिनिटे ते तसेच राहू द्या आणि नंतर कोमट केस पाण्याने धुवून टाका.

नारळ तेल सिरम

नारळाचे तेल केसांना मॉइश्चरायझ आणि पोषण देण्यास मदत करते, ज्यामुळे ते मऊ आणि चमकदार राहतात. याचे सिरम तयार करण्यासाठी नारळ तेल आणि बदाम तेल समान प्रमाणात एकत्र मिसळा आणि हे मिश्रण थोडे गरम करा आणि केसांना लावा. केसांच्या मध्यापासून ते टोकापर्यंत हे सिरम केसांना व्यवस्थित लावा आणि काही तास किंवा रात्रभर तसेच राहू द्या. नंतर सौम्य शाम्पूने केस धुवून टाका.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बनघरच्या भैरवनाथाची उद्या यात्रा
पुढील बातमी
दहशतवाद्यांचा आक्रमकपणे बिमोड केलाच पाहिजे

संबंधित बातम्या