सातारा : बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी 16 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चंदन नगर कोडोली येथे अर्चना आनंद भंडारे मूळ रा. चंदन नगर, कोडोली. सध्या रा. वरळी, मुंबई यांचे वडील आनंद गुलाब भंडारे यांनी त्यांच्या जागेत कंपाउंड चे काम सुरू केले असता तेथीलच वैभव दिलीप बनसोडे, दिलीप बाबुराव बनसोडे, लक्ष्मी गाडे, सुनीता दिलीप बनसोडे, माणिक शिंदे, अनिकेत शिंदे, शंकर गुलाब गायकवाड, दिलीप बुरुंगळे, संजय संभाजी कांबळे, संभाजी कांबळे, विनोद कांबळे, अतिश वाघमारे, ताराबाई वाघमारे, नंदा संभाजी कांबळे, छाया पवार आणि संजय बाबुराव बनसोडे आदींनी बेकायदेशीर जमाव जमवून जबरदस्तीने जागेमध्ये प्रवेश करत अर्चना भंडारे यांच्यासह त्यांच्या वडिलांना शिवीगाळ, दमदाटी केली. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.
शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी 16 जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 25 March 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गोकूळ प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीचा निरोप समारंभ उत्साहात
April 25, 2026
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
April 25, 2026
संगमनगर येथे कॅनॉल रोडवर अवैध दारू विकणाऱ्यावर गुन्हा
April 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026