शरद पवार सहकुटुंब 5 दिवस महाबळेश्वरात मुक्कामी

by Team Satara Today | published on : 03 March 2025


महाबळेश्वर : देशाचे माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खा. शरद पवार महाबळेश्वर येथे पाच दिवसाच्या मुक्कामासाठी परिवारासह दाखल झाले आहेत. हा संपूर्ण दौरा खासगी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

शरद पवार यांचे महाबळेश्वर येथे रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एका खासगी बंगल्याच्या हेलिपॅडवर आगमन झाले. ते कुटुंबीयांसह आले असून दि. 7 मार्चपर्यंत मुक्काम असल्याची माहिती मिळत आहे. महाबळेश्वर पर्यटस्थळी राजकीय नेतेमंडळींचे विश्रांतीसाठी नेहमीच येणे जाणे असते. देशातील दिग्गज राजकारण्यांचे महाबळेश्वर प्रेम सर्वश्रुत आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचेदेखील महाबळेश्वरवर विशेष प्रेम होते. दरवर्षी स्व. बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी येत असत. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे देखील दरवर्षी सहकुटुंब विश्रांतीसाठी महाबळेश्वर येथे येतात.

त्याचबरोबर अनेक नेते, नामवंत उद्योगपती, सिनेअभिनेते हवा बदलासाठी व निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर येथे येत असतात.खा. शरद पवार देखील नेहमी महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी येतात. याआधी देखील अनेकवेळा ते महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी आले आहेत. खा. पवार यांच्या दौर्‍यावेळी पोलिस प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. खा. पवार राहत असलेल्या बंगला व परिसरात कुणालाही प्रवेश नसून ते कुणाला भेटणार अथवा पर्यटनास बाहेर पडणार नसल्याची माहिती मिळत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गुलदार युद्धनौका पर्यटन मंडळाकडे सोपवण्याचा सन्मान माणच्या सुपुत्राला
पुढील बातमी
लिंगायत समाजाची ‘रुद्रभूमी’ विकसित करण्‍यास प्राधान्‍य : शिवेंद्रसिंहराजे भोसले

संबंधित बातम्या