राम मंदिर ट्रस्टवरील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करा; साताऱ्यात विरोधी पक्षांचे 'राम रक्षा' आंदोलन

by Team Satara Today | published on : 11 July 2026


सातारा : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने 'राम रक्षा' आंदोलन करण्यात आले. पावन हनुमान मंदिर परिसरात झालेल्या या आंदोलनातून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलकांनी प्रभू श्रीरामाविषयी देशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखण्यासाठी राम मंदिराशी संबंधित सर्व व्यवहार पूर्णपणे पारदर्शक असावेत, अशी भूमिका मांडली. तसेच कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवर संबंधित यंत्रणांनी वस्तुनिष्ठ चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नरेंद्र पाटील, यशवंत घाडगे, सागर धोत्रे, प्रणव सावंत, रमेश बोराटे, दत्ताभाऊ नलावडे, आतिष ननावरे, सुमित नाईक, गणेश अहिवळे, निमिष शहा, छाया शिंदे, मनसेचे राहुल पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, समीर घाटगे, अर्चना देशमुख, सुनील कोळेकर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ; जागा हस्तांतरण व येरळा नदीवरील बंधाऱ्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
पुढील बातमी
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने १६ लाखाची कार लांबवली

संबंधित बातम्या