श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या कैलास स्मशानभूमीतील सेवकांच्या कष्टाची जाणीव; दिवाळीत बोनसच्या रुपाने सन्मानाची भेट !

by Team Satara Today | published on : 31 October 2026


सातारा : श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या संगम माहुली येथील महाराष्ट्रात सर्व सोयीनियुक्त सर्व संपन्न एक नंबर असलेल्या कैलास स्मशानभूमीतील सेवकांना दिवाळी निमित्त श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सदस्य श्री. राजेंद्र चोरगे व संचालक मंडळाच्या शुभहस्ते सालाबाद प्रमाणे बोनस व दिवाळी साहित्य किटचे वाटप करण्यात आले. गेली २३ वर्षे अखंड सेवा करत असलेल्या सेवकांची दिवाळी गोड करण्यात आली.
याप्रसंगी राजेंद्र चोरगे यांनी सेवकांचे विशेष कौतुक करून गेली अनेक वर्षे सातारकरांना खुप चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत याचे नेहमीच कौतुक सातारकर करत असतातच. गेली २३ वर्ष सेवकांच्या पाठीशी उभा असलेला सेवाभावी परिवार, सेवकांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांच्या भविष्याचा विचार करून, सर्व सेवकांचा कर्मचारी राज्य विमा (ईएसआय), भविष्य निर्वाह निधीचा लाभ घेत असून दरमहा एस आय पी यातून सेवकांच्या भविष्याची काळजी घेतली जात आहे. या सर्व सेवकांचा पगार दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येत असतो. संचालक मंडळ सेवकांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त करून राजेंद्र चोरगे यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
सेवकांच्या वतीने चंद्रकांत कुंभार यांनी संचालक मंडळ सेवकांच्या सुख-दु:खात सहभागी होणारा परिवार असल्याचे सांगून संचालक मंडळ व उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमास श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव संजय कदम व विश्वस्त जगदिश खंडेलवाल, नितीन माने, संजय निकम, संतोष शेंडे, हरिदास साळुंखे, अंबाजी देसाई, उदय गुजर, दिपक मेथा, राजेंद्र खंडेलवाल, नितीन माने, विजय पवार, जगदिप शिंदे, श्रावण पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नशामुक्त भारत अभियानांतर्गत सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे जनजागृती सायकल रॅली उत्साहात
पुढील बातमी
कामगारांच्या प्रश्‍नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध; महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा सातारा विभागाचा दौरा उत्साहात

संबंधित बातम्या