प्रचाराआड शाहूनगरात रेकी ?

१५ जणांची टोळी फिरतेय; महिला, मुलांत धास्ती

by Team Satara Today | published on : 23 October 2024


/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}

सातारा : विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरु असतानाच साताऱ्यातील शाहूनगर भागात विचित्र प्रकार समोर आला आहे. शाहूनगरमध्ये एका लोकप्रतिनिधीचे नाव सांगत सुमारे १५ जणांची टोळी अपार्टमेंट, बंगल्यांमध्ये घुसत आहे. तेथे रेकी करत असून, या प्रकारामुळे महिला, मुलांत धास्ती निर्माण झाली आहेत.

सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे जोराने वाहत आहे. तसेच दिवाळीची धामधुमही सुरु आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टया जाहीर झाल्यानंतर अनेक शहरवासीय गावाकडे दिवाळी सण साजरा करण्यासाठी जातात. अथवा काही जण पर्यटनासाठी जात असतात. त्यामुळे शहरातील अनेक घरे, फ्लॅट रिकामेच असतात. त्याचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी घरफोड्या होत असतात.

शाहूनगरमध्ये सोमवारपासून सुमारे १५ जणांची टोळकी फिरत आहे. त्यात महिला, युवक, पुरुषही आहेत. येथील साईसृष्टी अर्पाटमेंट तसेच अन्य काही अर्पाटमेंट, घरांमध्ये जावून ते एका राजकीय उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आलो आहे, असे सांगत आहेत. मात्र, त्यांच्याबरोबर स्थानिक कार्यकर्ते दिसत नसल्याने संबंधित कुटुंबीय, महिला भयभीत झाल्या आहेत.

कोणती घरे, फ्लॅट बंद आहेत, कोणत्या घरात, फ्लॅटमध्ये कोण राहते, याची माहिती ते घेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्याकडून रेकी केली जात असल्याचीही चर्चा सुरु आहे. सातारा शहर पोलिसांनी त्याची दखल घेवून संबंधितांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.

 

११२ नंबरवर कॉल करा

संशयास्पद लोक फिरताना, माहिती घेताना कोठे दिसल्यास स्थानिक लोकांनी तत्काळ पोलिसांनी संपर्क साधण्याची गरज आहे. तसेच ११२ नंबरवर कॉल करावा. तेथे तत्काळ पोलीस पाठवून तपास केला जाईल. स्थानिक गृहनिर्माण सोसायट्या, सार्वजनिक मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

- राजेंद्र म्हस्के

पोलीस निरीक्षक, सातारा शहर.

 सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत

गृहनिर्माण सोसायट्या, अर्पाटमेंटमध्ये चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची नितांत आवश्यकता आहे. येथील साईसृष्टी अर्पाटमेंटमध्ये हा प्रकार घडला आहे. मात्र, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची माहिती समोर येत आहे. गुन्हेगारीच्या घटना घडू नयेत, त्यावर आळा बसावा तसेच घडल्यास त्याचा तपास होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयत्याने हात तोडणारांना ठोकल्या बेड्या
पुढील बातमी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

संबंधित बातम्या