सातारा : सातारा जिल्ह्यातील निसर्गाच्या सानिध्यात अनेक चित्रपटांच्या व दूरचित्रवाणी वाहिन्यांवर अनेक ठिकाणी चित्रिकरण चालू आहेत. कोकणाच्या मातीशी नाळ घट्ट ठेवणारा व साताऱ्याच्या निसर्गाची संगत असलेला मराठी हिंदी चित्रपटातील आघाडीचा अभिनेता संजय खापरे यांनी प्रसिद्ध चित्रकार मोहन जगताप व मित्रपरिवाराच्या वतीने चंद्र विलास या हॉटेलमध्ये झणझणीत मिसळ पावचा आस्वाद घेवून पाहुणचार घेतला. यावेळी जेष्ठ मेकअप आर्टिस्ट अभय मोहिते व मान्यवर उपस्थित होते.
साताऱ्याच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या निसर्गाने व माणुसकीच्या नात्यातून आपलेसे केलेला प्रत्येक कलावंत सातारच्या मातीशी एकरूप झालेले दिसतात.. साताऱ्यात चित्रपटात असो अगर दूरचित्र वाहिन्यांवरील चित्रीकरणाला आलेला कलाकार हमखास चंद्र विलास या हॉटेलच्या विविध मेनूचा आस्वाद हमखास घेत असतात.
संजय खापरे हे हरहुन्नरी अभिनेते असून अनेक नाटकाला पुरस्कार प्राप्त असून " दगडी चाळ " मधिल चित्रपटातून खलनायक सार्या महाराष्ट्राने पाहून आघाडीच्या अभिनेता म्हणून अनेक नाटके व चित्रपटातील भूमिकांमध्ये महाराष्ट्र ओळखू लागला. त्यांच्या साताऱ्यावरील प्रेमाबद्दल आदर व जवळीक असून पर्यटकांना आकर्षित करणारा जिल्हा म्हणून लवकरच देशात व विदेशात नावलौकिक मिळेल व पर्यटनातून चित्रपट व विविध प्रकारच्या माध्यमातुन रोजगार निर्मिती होईल, अशी अशा व्यक्त करून साताऱ्यातील मित्र परिवारातून व त्यांच्या सहवासातून प्रेरणा व ऊर्जा मिळते असेही ते म्हणाले.