सदरबाजार येथील बंद पडलेल्या इमारतीच्या आडोशाला अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 16 March 2026


सातारा : सदर बाजार येथील समाज कल्याण ऑफिस समोर बंद पडलेल्या इमारतीच्या आडोशाला अंधाराचा फायदा घेऊन स्वतःचे अस्तित्व आणि स्वतःचा चेहरा लपून दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेला अजित बक्षु डोंगरे (वय ३९ , रा. भीमाबाई आंबेडकर नगर सदर बाजार, सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस कॉन्स्टेबल वैभव माने यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान दि. १५ रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. त्याच्याकडे अधिक विचारपूस केले असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार घोडके करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रक्षक प्रतिष्ठानच्या 'डिजिटल व्हॅन'चे खा.उदयनराजे यांच्या हस्ते लोकार्पण ; नागरिकांच्या दारात जाऊन होणार मोफत आरोग्य तपासणी
पुढील बातमी
गांजा सेवन केल्याप्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार एकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या