जिल्हा परिषदेच्या 'गुढीपाडवा पट वाढवा' उपक्रमाची उत्साहात सुरुवात ; उंब्रज येथील शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज यांच्या हस्ते आरंभ

by Team Satara Today | published on : 19 March 2026


सातारा : जिल्हा परिषद शाळांचा पट वाढावा तसेच त्यांचे गुणवत्ता वाढावी पालकांमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीमध्ये आत्मविश्वास वाढवा,  सर्व शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवा, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून गुढीपाडवा पट वाढवा हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे. 

त्याची सुरुवात उंब्रज ता. कराड येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व दाखल पात्र विद्यार्थ्यांचे स्वतः स्वागत केले तसेच शैक्षणिक गुढीचे पूजन केले आपल्या व्यस्त कार्यक्रमात सुद्धा दोन्ही मॉडेल स्कूलच्या बांधकामाची तपासणी केली. सर्व ग्रामस्थांना आपली मुले जिल्हा परिषद शाळेतच पाठवण्याच्या आवाहन  केले.  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असून शिक्षण विभागासाठी जे जे काही करता येईल ते करून जिल्हा परिषद शिक्षण विभाग राज्यात आदर्शवत कसा करता येईल याबाबत प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.

शाळेने राबवलेल्या विविध उपक्रमाची माहिती घेतली तसेच येथे एप्रिल महिन्यामध्ये शिक्षक सक्षमीकरण कार्यक्रम तसेच ज्या व्यवस्थापन समिती आपल्या शाळेचा पट वाढवतील त्यांचा सत्कार व सन्मान जिल्हा परिषदेचे वतीने करण्यात येणार असल्याचे सांगितले सर्व जिल्ह्यात हा कार्यक्रम उत्साहामध्ये राबवण्याच्या आवाहन याशनी नागराज यांनी यावेळी केले.  यावेळी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नाईकवडी तसेच गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे शिक्षण विस्तार अधिकारी संमती देशमाने हे उपस्थित होते तसेच शिक्षक पालक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात श्रीराम महायज्ञ, श्रीराम नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ; रामनवमीला यज्ञस्थळापासून शोभायात्रा
पुढील बातमी
रत्नागिरीत दाऊदच्या जमिनींचा लिलाव अखेर यशस्वी; मुंबईतील गुंतवणूकदाराची सर्व भूखंडांवर मालकी

संबंधित बातम्या