सातारा : सातारा तालुक्यातील भरतगाववाडी परिसरात घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलिसांकडे करण्यात आली आहे. या घटनेमुळे वेचले गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष श्रीरंग राजे (वय 45, रा. वेचले, ता. जि. सातारा) हे 29 मे रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
याबाबत रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करत आहेत.