सैदापूरमध्ये बिअर बारसमोर हाणामारीप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा; घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण

by Team Satara Today | published on : 17 May 2026


सातारा : तालुक्यातील सैदापूर येथे बिअर बारसमोर झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैदापूर गावच्या हद्दीतील एका बिअर बारच्या बाहेर १४ मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुधीर मानसिंग जाधव (रा. मोळाचा ओढा) याने किरण कलेराव गोगावले (वय ३७, रा. वर्ये) यांना मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सातारा तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास सहाय्यक फौजदार माने करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूपुरी परिसरात मोबाईल चोरी करून एकाच्या बँक खात्यातील ३१ हजारांवर डल्ला
पुढील बातमी
लिंब गावातील चतुरबेट परिसरात कौटुंबिक वादातून वृद्ध महिलेला मारहाण

संबंधित बातम्या