सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खटाव तालुक्यातील एका गावातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद तिच्या आईने पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. तपास सहायक निरीक्षक संदीप पोमण करत आहेत.