सातारा : कोडोली येथील महाराजांची बाग परिसरात असलेल्या अनिल हणमंतराव जाधव यांच्या प्लॉटिंगमधील ३१५ KVA क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमधून अज्ञात चोरट्याने सुमारे ६५ हजार रुपयांच्या किमतीचे साहित्य चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रान्सफॉर्मरमधील अंदाजे १०० किलो वजनाची कॉपर कॉईल, ऑईल तसेच फिडर पॅनलमधील स्विच कव्हर अज्ञात इसमाने संमतीशिवाय लबाडीने चोरून नेले. ही घटना कोडोली येथील महाराजांची बाग परिसरात घडली आहे.
या प्रकरणी शिवानी प्रकाश शेवाळे (वय २८, व्यवसाय – विद्युत सहाय्यक, रा. चंदन नगर, कोडोली, ता. सातारा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक पिसाळ हे करत आहेत.