वाठार स्टेशन येथील वागदेव कॉलेजमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

by Team Satara Today | published on : 15 March 2025


सातारा : वाठार स्टेशन येथील वागदेव कॉलेजमध्ये डॉ. विश्वनाथ हिरानाथ चव्हाण, वाठार हेल्थ स्टेशन आणि महाराष्ट्र मल्टी स्पेशलिटी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दि. 16 मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे.

आपल्या समाजातील दुर्बल घटकांना आवश्यक आरोग्य सेवा पुरवणे हा या शिबिरामागील प्राथमिक उद्देश आहे. या शिबिरात गरजूंना सामान्य आरोग्य आणि कल्याण सुधारण्यासाठी विविध मोफत सल्लामसलत आणि मोठ्या प्रमाणात सवलतीच्या सुविधा देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अनुभवी वैद्यकीय सल्लागारांद्वारे समुपदेशनाद्वारे मौल्यवान सल्ला आणि व्यावसायिक मार्गदर्शनाचा अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ घेता यावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. विश्वनाथ हिरानाथ चव्हाण, वाठार हेल्थ स्टेशन आणि महाराष्ट्र मल्टी स्पेशलिटी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये एचडीए1सी ही साखरेसाठीची खर्चिक तपासणी, शुगर तपासणी, बीपी, फुप्फुस कार्य, ईसीजी या तपासण्या तसेच सातारा जिल्ह्यातील स्त्री रोग तज्ञ डॉ. स्मिता जाधव यांच्यामार्फत युवती व महिलांसाठी स्त्रीरोग सल्ला व समुपदेशन, त्वचारोग तज्ञ डॉ. अण्णासाहेब कदम यांच्यामार्फत सर्वांसाठी त्वचारोग सल्ला व समुपदेशन करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. विश्वनाथ हिरानाथ चव्हाण यांचेही बहुमोल मार्गदर्शन लाभार्थ्यांना मिळणार आहे.

 त्याचबरोबर गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी मध्ये पहिल्या व तिसर्‍या तिमाहीत 50 टक्के सवलत, पुरुष आणि महिला वंध्यत्व उपचारांमध्ये विशेष सल्ला आणि सवलती, गर्भाशयाच्या अथवा मुखाच्या कॅन्सरच्या पूर्व तपासणी मध्ये 60 टक्के सवलत, डिलिव्हरी आणि दुर्बिणीतील शस्त्रक्रियेमध्ये विशेष सवलत देण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये वाठार स्टेशन, दहिगाव, पिंपोडे बुद्रुक, देऊर, तडवळे, नलावडेवाडी, विखळे, बिचुकले, तळिये या गावांचा समावेश आहे. हे शिबिर रविवार दिनांक 16 मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत वॉटर स्टेशन येथील वाघदेव विद्यालयात भरवण्यात आले आहे. मोफत नोंदणीसाठी सौ. शितल पवार- 8088539394, महेश गांधी- 9730085685, अभिजीत निकम- 8652396336 यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या आरोग्याविषयक जागरुक राहून या महाशिबिरामध्ये सहभागी होवून लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'कला जीवनगौरव पुरस्कार' प्रदान
पुढील बातमी
वनव्याने पेटलेली आंब्याची बाग विझविताना शेतकर्‍याचा मृत्यू

संबंधित बातम्या