दोन दुचाकींची समोरासमोर धडक

धडकेत एक ठार; दोघे गंभीर

by Team Satara Today | published on : 25 August 2025


खंडाळा : पारगाव- खंडाळा महामार्गावरील सेवा रस्त्यावर आज दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये एक जण ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना काल दुपारी घडली.

रामनरेश रामजी यादव (वय ३०, रा. केसुर्डी फाटा, ता. खंडाळा) असे जागीच ठार झालेल्याचे नाव आहे, तर रोहन महादेव यादव व नारायण जगन्नाथ यादव (दोघे रा. पारगाव, ता. खंडाळा) हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबतची माहिती अशी की, महामार्गावरील केसुर्डी व पारगावदरम्यानच्या सेवा रस्त्यावर भरधाव आलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले, तर रामनरेश यादव हे जागेवरच ठार झाले. ते जयभवानी हॉटेलमध्ये कर्मचारी होते. या अपघातात पारगावचे दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना पुणे येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची फिर्याद सूरज ज्ञानेश्वर यादव यांनी दिली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माण-खटाव मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुढील बातमी
कराड येथील ईदगाह मैदानाच्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ : पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या