शेंद्रेत उधारीच्या वादातून डोक्यात खोरे घालून तरुणाची हत्या

सौरभ भिसे यांचा मृत्यू; सख्खे भाऊ असलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

by Team Satara Today | published on : 04 October 2026


सातारा : सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. सौरभ भिसे (रा. शेंद्रे) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रमोद किसन जाधव आणि प्रताप किसन जाधव (दोघेही रा. शेंद्रे) या सख्ख्या भावांनी सौरभ यांच्या डोक्यात खोरे घालून त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून सौरभ आणि संशयितांमध्ये वाद झाल्याचे समजते. या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याने शेंद्रे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही संशयितांना तातडीने ताब्यात घेतले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
उधारीच्या पैशांच्या वादातून तरुणाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा सविस्तर तपशील पोलीस तपासातून समोर येणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
न्हाळेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात २६ महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू; अचानक वीज गेल्याने घडली दुर्दैवी घटना, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

संबंधित बातम्या