सातारा : सदरबझार परिसरात अज्ञात चोरट्यांनी चैन स्नॅचिंग केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यात दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून चोरुन नेले. ही घटना दि. 31 मे रोजी घडली आहे. याप्रकरणी सौ.दिप्ती संतोष पिसाळ (वय 34, रा. सदरबझार, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.