सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी कार चालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 मार्च रोजी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास पोवई नाका परिसरात भरधाव वेगाने कार क्र. एमएच 05 इजे 2704 चालवून एका दुचाकीला धडक देऊन दुचाकी स्वार दत्ता विष्णु तोरस्कर यांना जखमी केल्याप्रकरणी कारचालक ओंकार अरविंद सणस यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.