09:16pm | Oct 01, 2024 |
सातारा : सातारा शहरातील वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजना आणि पाणी वितरिका यांना स्मार्ट जलमापके बसवली जाणार आहेत. या कामाचा ऑनलाइन शुभारंभ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. हा कार्यक्रम सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
सातारा पालिकेने सातारकरांना विशेष सुविधा देण्यासंदर्भात पावले उचलली आहेत .सातारा शहराला कास तलाव व उरमोडी नदी अर्थात शहापूर उद्भव योजनेतून पाणीपुरवठा केला जातो .सातारा शहरासह हद्द वाढीच्या भागात साधारण साडेआठ हजार नळ कनेक्शन आहेत. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पाण्याचे नियमन करणे, त्याचे वॉटर ऑडिट होणे तसेच पाण्याची गळती होऊन होणारे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट जलमापके बसवण्याचे नियोजन आहे नगरोत्थान योजनेअंतर्गत या प्रकल्पाला निधी दिला जात आहे.
या जलमापकांचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होणार आहेत .या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण हे छत्रपती शिवाजी सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे . सातारा पालिका पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेमध्ये पुढचे पाऊल टाकत आहेत पाणीपुरवठ्याचे सुलभीकरण करणे आणि त्यात सुटसुटीतपणा आणणे प्रणालीचा मूळ उद्देश आहे सर्वसाधारण या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |