पायाच्या तळव्यांना खाज येणे ही खूप सामान्य बाब आहे. अनेकदा लोक ही छोटी गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र जर सातत्याने तुमच्या पायाच्या तळव्यांना खाज येत असेल तर ही गोष्टी तुमच्यासाठी चिंतेची ठरु शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पायाच्या तळव्यांना सातत्याने खाज येणे ही एखाद्या मोठ्या आजाराचे संकेत असू शकतात. त्यामुळं याकडे दुर्लक्ष न करता लगेचच डॉक्टरांकडे जा आणि याची योग्य तपासणी करुन घ्या. अन्यथा तुम्ही अडचणीत फसू शकता.
डॉक्टरांच्या मते, जर तुमच्या पायांना सातत्याने खाज येत असेल तर एथलीट फुटचे लक्षण असू शकते. हे एकप्रकारचे फंगल इंफेक्शन असू शकते ते साधारणतः खेळाडूंमध्ये दिसते. सतत धावणे किंवा खेळाची प्रॅक्टिक्स करणे यामुळं पायांच्या बोटांमध्ये खाज येणे, जळजळ होणे यासारखा त्रास होण्याची शक्यता होऊ शकते. अशातच डॉक्टरांशी संपर्क करायला हवा.
किडनीचा आजार
पायाच्या तळव्यांना सातत्याने खाज होणे हा किडनी खराब होण्याचे संकेत असतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा किडनीचे कार्य नीट होत नसेल तर रक्त फिल्टर होत नाही. त्यामुळं शरीरात युरियाची मात्रा वाढायला लागते. त्यामुळं पायांच्या तळव्यांना खाज येऊ शकते.
एक्जिमा
ही त्वचेसंदर्भातील एक समस्या आहे. यात शरीरावर लाल रंगाचे पुरळ उठते त्यामुळं त्वचेवर जळजळ होते आणि सतत खाज येते. पायाच्या तळव्यांवरही खाज येत असेल तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधा.
लिव्हर
पायांच्या तळव्याला खाज येणे हे देखील यकृताच्या आजाराचे लक्षण असू शकते. डॉक्टरांच्या मते, जेव्हा आपले यकृत योग्यरित्या कार्य करत नाही. तेव्हा शरीरात वाहणाऱ्या रक्तातील बिलीरुबिनची पातळी वाढते. यामुळे आपल्या शरीरात खाज सुटणे याची समस्या वाढते.
पायाच्या तळव्याची खाज कमी करण्याचे उपाय
जर तुम्हालाही पायांच्या तळव्याला खाज येण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही घरगुती उपायदेखील करु शकतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्याने चांगले धुवा आणि टॉवेलने पुसा. खाज कमी करण्यासाठी आणि त्वचेला ओलावा देण्यासाठी खोबरेल तेल लावा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कडुलिंबाचे पाणी, कोरफड जेल किंवा अॅपल सायडर व्हिनेगर देखील वापरू शकता. या सर्व गोष्टींमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे खाजेवर रामबाण उपाय आहेत.