उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

by Team Satara Today | published on : 22 July 2025


सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचा वाढदिवस सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे सातारा जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्व तालुक्यात आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र शिबिर, शालेय साहित्य वाटप, रुग्ण व गरजूंना फळे वाटप, विविध स्पर्धांचे आयोजन तसेच वक्तृत्व स्पर्धा व व्याख्यानमाला अशा विविध सामाजिक उपक्रमाने वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

पोवई नाका येथील सातारा जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई जाधव, युवक प्रदेश उपाध्यक्ष मनोज देशमुख, युवती प्रदेश संघटिका स्मिता देशमुख, सातारा तालुका अध्यक्ष संदीप चव्हाण, सेवा दल अध्यक्ष प्रकाश येवले, असंघटित  कामगार अध्यक्ष संतोष नानावरे, ओबीसी कार्याध्यक्ष माधव लोहार, महिला उपाध्यक्ष लक्ष्मीताई कळंबे, सातारचे नेते भाऊ शिर्के, युवतीच्या सुप्रिया देशमुख, विद्या शिंदे, नंदलाल पवार, रमेश बुलंगे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोमनाथ पवार यांचा उपक्रम आदर्शवत : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे
पुढील बातमी
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पत्ते खेळून आंदोलन

संबंधित बातम्या