सातारा : सिव्हिल हॉस्पिटल मध्ये चोरी करणाऱ्या चोरट्या विरोधात सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सौद अहमद खान रा. शाहूनगर, गोडोली, सातारा हा सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथील पीएम रूम येथे अंदाजे आठ हजार रुपये किंमतीच्या दोन हायड्रोलिक कॉट चोरताना आढळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.