मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर सचिन तेंडुलकरने राज्य केलं. म्हणूनच त्याला क्रिकेटचा देव म्हणतात. अनेकदा त्याने शानदार बँटिंग करुन टीमला संकटातून बाहेर काढलं. आता त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सुद्धा स्वत:मध्ये असलेलं टॅलेंट दाखवून देतोय. अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यात तो फोर, सिक्सचा पाऊस पाडताना दिसतोय. त्याने फक्त चेंडू सीमारेषेपारच पाठवला नाही, त्याने अडखळणारा आपल्या टीमचा डाव सावरला. स्कोरकार्डवर दिसतय निम्मी टीम पॅवेलियनमध्ये परतल्यानंतर अर्जुनने टीमची बुडणारी नौका किनाऱ्याला लावली.
अर्जुन तेंडुलकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात टीमच स्कोरकार्ड सुद्धा दिसतय. टीमचे 87 रन्सवर 5 विकेट गेले होते. त्यावेळी अर्जुन 5 रन्सवर खेळत होता. पुढच्या व्हिडिओमध्ये टीमचा स्कोर 9 विकेटवर 219 झाला होता. त्यावेळी तो 47 धावांवर खेळत होता. म्हणजे त्याने शानदार फलंदाजी करुन टीमला सन्मानजनक स्थितीत पोहोचवलं. पुढच्या डावात तेंडुलकर 61 धावांवर खेळताना दिसतोय. ज्यात 7 विकेटवर 188 धावा झाल्या होत्या. हा स्कोर आणि व्हिडिओ पाहून अर्जुनने टीमची नौका किनाऱ्याला लावली हेच दिसतय. आता अर्जुनचा हाच फॉर्म कायम रहावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
अर्जुन तेंडुलकर स्थानिक क्रिकेट खेळून देशांतर्गत सीजनसाठी स्वत:ला तयार करतोय. काही दिवसांपूर्वी याच सामन्यांमधील गोलंदाजीचे व्हिडिओ त्याने शेअर केले होते. अर्जुन या व्हिडिओत घातक गोलंदाजी करताना दिसतोय. त्याने वेग, बाऊन्स आणि स्विंगने झहीरची आठवण करुन दिली. युवराज सिंगने सुद्धा अर्जुनच्या गोलंदाजीवर कमेंट केली.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |