फलटणच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. प्रियदर्शनी भोसले; स्वीकृत सदस्यपदी श्रीमंत अनिकेतराजे निंबाळकर,सुदामराव मांढरे आणि अशोकराव जाधव

by Team Satara Today | published on : 22 January 2026


फलटण : फलटण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या सौ. प्रियदर्शनी भोसले, स्वीकृत सदस्यपदी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर,सुदामराव मांढरे आणि अशोकराव जाधव यांची निवड करण्यात आली. 

आज फलटण नगरपालिकेच्या सभागृहात उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव सौं प्रियदर्शनी भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सौं प्रियदर्शनी भोसले यांचे सासरे दिलीपसिंह भोसले यांनी यापूर्वी नगराध्यक्ष म्हणून तर त्यांच्या सासू सौं मधुबाला भोसले यांनी नगरसेविका म्हणून काम पहिले आहे.

याच वेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपाचेच माजी ज्येष्ठ नगरसेवक सुदामराव मांढरे, अशोकराव जाधव, शिवसेनेचे श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची निवड झाली. या निवडीबद्दल सर्वांचे माजी खासदार  रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले,ऍड नरसिंह निकम,अभिजित नाईक निंबाळकर, सर्व नगरसेवक यांनी अभिनंदन केले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात ; पुणे जिल्ह्याने खेळाला दिले प्राधान्य -अजित पवार
पुढील बातमी
आइडियल इंटरनॅशनल स्कुल च्या डॉ. वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ जाहीर; विविध स्तरावरुन अभिनंदन

संबंधित बातम्या