सातारा : सातारा जिल्ह्यात शासनाच्या वतीने किमान आधारभुत किंमत खरेदी योजना पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत जिल्ह्यात एकूण ७ ठिकाणी भरडधान (मका) खरेदी करीता ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु केली आहे. हंगाम २०२६-२७ मध्ये भरडधान्य (मका) दर रु.२४१०/-, ज्वारी हायब्रिड दर रू. ४०२३/- व बाजरी दर २९००/-प्रति क्विंटल हमिभाव शासनकडून निश्चित झालेला आहे.
सदर योजनेचा लाभ होणेसाठी शेतक-यांनी संबंधित तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात जावून आधार कार्ड प्रत, आधार लिंक बँक खाते पासबुकची स्वयंस्वाक्षकित प्रत, पिकपेरा नोंद असलेला अद्यावत ७/१२ व ८-अ, उतारा, आणि अॅग्रीस्टॅक आयडी सादर करुन ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी.
भरडधान्य (मका) शेतकरी ऑनलाईन नोंदणीचा कालावधी १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आहे. कृषी विभागाकडून लागू करण्यात आलेल्या अॅग्रीस्टॅक या संकेत स्थळावर शेतकरी क्र. (Farmer ID) देणे बंधन कारक आहे. असेही जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी कळविले आहे.