सातारा शहरासह तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे अपहरण; अज्ञातावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 19 September 2026


सातारा : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे अपहरण झाल्याच्या फिर्यादी सातारा शहर तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सिद्दिक सिकंदर बागवान (रा. म्हसवे, ता. सातारा) या युवकाचे राहत्या घरातून अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार यु. बी. माने करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, किरण सुरेश सावंत (रा. गुलमोहर सोसायटी, शाहूपुरी, सातारा) यांचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मसाप, पुणे शाहुपुरी शाखेचे कार्य जोमात पुढे सुरु ठेवणार - नंदुकमार सावंत : वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
पुढील बातमी
मतिमंद अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद

संबंधित बातम्या