प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांनी लिहिलेल्या 'शरद पवार आणि पुलोदचा प्रयोग' या पुस्तकाचे प्रकाशन

by Team Satara Today | published on : 14 December 2025


सातारा  : रयत शिक्षण संस्थेच्या माढा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांनी लिहिलेल्या 'शरद पवार आणि पुलोदचा प्रयोग' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकात शरद पवार यांनी १९७८ मध्ये सर्वात मोठा राजकीय निर्णय घेत 'पुलोद'चा प्रयोग केला होता, यासह अन्य स्थितीवर भाष्य केले आहे.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्तेच या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुस्तकात शरद पवार यांची लहान वयापासून ते सध्याच्या कालावधीपर्यंत जडणघडण कशा पद्धतीने झाली. पुरोगामी लोकशाही दल शासनाचा प्रयोग. देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी केलेल्या कामगिरीचा सविस्तर आढावा लिहिला गेला आहे.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, खासदार निलेश लंके, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह महिबूब शेख, नागेश फाटे, भरत बाड, भावना घाणेकर, डॉ. सुलक्षणा शीलवंत, प्रशांत काळेल, वसंत देशमुख आदी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉक्टरला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून ५० लाखांची खंडणी; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
ड्रग्ज माफियांचा साताऱ्यात शिरकाव

संबंधित बातम्या