सातारा पालिकेचे सील तोडून गाळा वापरल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 21 August 2026


सातारा : नगरपालिकेच्या राजवाडा येथील गाळ्याला सील असताना ते काढून अनधिकृतपणे गाळा वापरल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र चंद्रकांत वंजारी (रा. कुरणेश्वर, जकातवाडी, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी पालिकेचे अमेय अनिल शिंदे (रा. सातारा) या अधिकार्‍यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत असे म्हटले आहे की, दि. 12 मे रोजी सिटी सर्वे नंबर 269 मध्ये असलेला पालिकेचा दुकानगाळा सील करण्यात आला होता. त्यावर लाखी सील लावण्यात आले हाते. मात्र जितेंद्र वंजारी याने गाळ्यावर लावलेले नोटीस व सील तोडून नियमांचे उल्लंघन केले. तसेच अवधूत टुर्स ट्रॅव्हल्स नावाचा बोर्ड लावला. ही बाब समोर आल्यानंतर दि. 20 ऑगस्ट रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चारित्र्याच्या संशयावरून कराडमध्ये महिलेचा निर्घृण खून; संशयित प्रियकर पोलिसांत हजर
पुढील बातमी
तनिष्क ज्वेलरी दुकानातून महिलेने केला लाख रुपये किंमतीचा दागिना लंपास

संबंधित बातम्या