सातारा : सातारा बसस्थानकातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सातारा एसटी स्टँड येथून आकाश अशोक सरकटे रा. नऱ्हे, जि. पुणे हे पुणे येथे जातो, असे सांगून निघून गेले आहेत. ते अद्याप पर्यंत घरी आले नाहीत. याबाबतची फिर्याद त्यांच्या मुलीने सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.