संजय शेलार खून प्रकरणी ‘जलसागर’चे अरुण कापसे यांना अटक

by Team Satara Today | published on : 15 January 2025


सातारा : फळणी, ता.जावली येथील संजय गणपत शेलार (वय 32) यांच्या खून प्रकरणी अरुण कापसे यांना अटक करण्यात आली. 15 दिवसांपूर्वी मेढा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संजय शेलार यांना मारहाण झाल्यानंतर सकाळी त्यांचा मृतदेह अंधारी गावच्या हद्दीत आढळून आला. मेढा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यामुळे शेलार यांना मारणारे मारेकरी कोण? असा सवाल यानंतर उपस्थित झाला. मेढा, वाई पोलीस तपास करत असताना त्यांना यश येत नव्हते. यामुळे फळणीचे ग्रामस्थ व शेलार कुटुंबिय आक्रमक झाले होते. मारेकर्‍यांचा तात्काळ शोध घ्यावा, यासाठी निवेदनेही देण्यात आली होती.

खून प्रकरणी पोलिसांचा प्राथमिक तपास सुरु असताना बुधवारी सकाळी जलसागरचे अरुण कापसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुमारे 4 तास चौकशी केल्यानंतर सांयकाळी त्यांना अटक केली. यानंतर घडलेल्या घटनांमध्ये कापसे यांचा जामीन झाला असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बोकडाची चोरी
पुढील बातमी
जुगार प्रकरणी दोन जणांवर कारवाई

संबंधित बातम्या