फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रम

by Team Satara Today | published on : 24 August 2026


फलटण : तालुक्यातील १८ ते ३५ वयोगटातील महिला, तरुणी आणि युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी 'सीवायडीए' पुणे, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क सातारा आणि नवयान संशोधन उन्नती व प्रशिक्षण संस्था बरड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येत आहे.

​या उपक्रमांतर्गत सहभागी उमेदवारांना त्यांच्या आवडीनुसार विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण शक्यतो सहभागींच्या स्थानिक परिसरातच उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून, प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रत्येक पात्र उमेदवाराला अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल.

​प्रशिक्षणानंतर उमेदवारांना सातारा जिल्ह्यासह स्थानिक पातळीवर रोजगाराच्या चांगल्या संधी मिळवून देण्यासाठी थेट सहकार्य व मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना स्वतंत्र व्यवसाय मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध असेल.

​या संधीचा लाभ घेण्यासाठी १८ ते ३५ वयोगटातील इच्छुक महिला व युवकांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी हनुमंत भानुदास लोंढे (नवयान संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण संस्था, बरड, मो. ९११२३४९७९७) यांच्याशी संपर्क साधावा. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयना धरणात १०० टीएमसी पाणीसाठा; तीन राज्यांवरील जलसंकट टळले

संबंधित बातम्या