विहिरीत बुडून महिलेचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 12 June 2025


सातारा : विहिरीत बुडून महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जकातवाडी ता.सातारा येथे सावित्रा विठ्ठल महाडीक (वय 58, रा.जकातवाडी) या पाय घसरुन विहरीत पडल्याने जखमी झाल्या. रुग्णालयात त्यांना दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉँक्टरांनीसांगितले. दि. 11 जून रोजी ही घटना घडली आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार घोरपडे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीचे अपहरण
पुढील बातमी
महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्राच्या अतिथीगृहाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते भूमिपूजन

संबंधित बातम्या