सातारा : सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ मध्ये भाग घेणाऱ्या गणेश मंडळापैकी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास रुपये ७,५०,००० हजार, व्दितीय रुपये ५,००,०००, तृतीय २,५०,००० इतक्या रकमेचे पारितोषिक देवुन गौरविण्यात येणार होते. तर जिल्हा स्तरीय प्रथम,व्दितीय, तृतीय क्रमांकाच्या गणेशोत्सव मंडळास अनुक्रमे ५० हजार, ४० हजार, ३० हजार इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे .तर तालुकास्तरीय विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास रुपये २५ हजार इतक्या रकमेचे पारितोषिक देवुन गौरवण्यात येणार आहे.
सातारा जिल्हयातील एकुण १२ गणेशोत्सव मंडळानी त्यामध्ये भाग घेतला होता.जिल्हयातील खालील मंडळाना जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर क्रमांक प्राप्त झाले अहेत.
जिल्हास्तरीय विजेत्यांचा निकाल – प्रथम क्रमांक अभय कला व क्रिडा गणेशोत्सव मंडळ, नागठाने,ता, सातारा. व्दितीय क्रमांक सार्वजनिक गणेशोत्सव महोत्सव “क” वर्ग तीर्थक्षेत्र नरवणे, ता. खटाव तृतीय क्रमांक भिमाशंकर गणेशोत्सव मंडळ,आर्वी ता. कोरेगाव यांना मिळाले आहेत. तालुकास्तरीय रकमेचे पारितोषिक विभागुन तीन मंडळाना देण्यात आले.संगम गणेश मंडळ,गांधी चौक,तांबवे,श्री सावळेश्वर युवा गणेशोत्सव मंडळ,महादेव मंदीर, पुसेसावळी,रणसग्रांम मित्रपरीवार,वेळे, ता. वाई यांना देण्यात आला.