सातारा : स्वमग्न मुलांच्या पालकांसाठी दि. ५ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता आनंदवन विशेष मुलांची शाळा व्यवसाय प्रशिक्षण केंद्र नवीन एमआयडीसी सातारा येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक स्वमग्न दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पसचे चेअरमन डॉ. जवाहरलाल शाह यांनी दिली आहे.
या कार्यशाळेमध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजश्री देशपांडे स्वमग्न मुलांना उपचार देणारे विशेष तज्ज्ञ चित्रा शिंदे व होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जवाहरलाल शहा इत्यादी मान्यवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत .ही कार्यशाळा सकाळी पावणेदहा ते सव्वा बारा यादरम्यान होणार असून ही कार्यशाळा संपूर्ण मोफत आहे. कार्यशाळेला येणाऱ्या पालकांसाठी सातारा बसस्थानक येथून शाळेपर्यंत विशेष बसची सोय करण्यात आली आहे.स्वमग्न मुलांच्या पालकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.