सातारा : भाजल्याने जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गरम पाण्याने भाजल्याने उपचारासाठी युवकाला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये युवकाला दाखल केले होते. पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दि. 12 रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. साहिल इम्तियाज अन्सारी (वय 20, रा. कोंडवे, ता. सातारा) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. सहायक फौजदार माने तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
दुश्मनासोबत का फिरतोस?; साताऱ्यात मित्रावर कोयत्याने हल्ला
September 27, 2026
एक लाख रुपये परत मागितल्याचा वाद; दुकानदाराकडून तिघांना मारहाण
September 27, 2026