आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्न केल्यानंतर या गवार नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत अनेक लोक हॉटेलमध्ये फसली होती. तातडीने अशा लोकांना बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिका दाखल होताच त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या भीषण आगीच्या घटनेमुळे १४ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
हॉटेलमध्ये अजूनही बचावकार्य सुरु आहे. पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील ऋतुराज हॉटेलमध्ये भीषण आग लालग्याची घटना घडली. थोड्याच वेळात आगीने भयाण रूप धारण केले. अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन बचावकार्य करत आहे. याचवेळेस १४ लोकांचे मृतदेह देखील बाहेर काढण्यात आले आहे. मृत पावलेल्यांची अजून ओळख पटलेली नाही.कोलकाता येथील हॉटेलमध्ये आग काशमउळे लागली याची चौकशी केली जाणार आहे. शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे. सध्या हॉटेल सीज करण्यात आले आहे. तर भाजपने या प्रकरणात जो कोणी आरोपी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर जखमी झालेल्या आणि मृत पावलेल्या लोकांना योग्य ती मदत करावी अशी मागणी देखील केली आहे.कोलकातामधील हॉटेलमध्ये भीषण आग
14 जणांचा होरपळून मृत्यू; 22 जणांना वाचवलं, जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या छतावरून अन् खिडक्यांमधून उड्या
by Team Satara Today | published on : 30 April 2025

कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. कोलकातामधील एका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण होती कि संपूर्ण हॉटेल आणि आजूबाजूचे काही बिल्डिंग या आगीच्या कचाट्यात सापडले. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण या हॉटेलच्या आत अडकल्याचे समोर येत आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा