जिल्हा बँकेच्या कामकाज वेळेमध्ये बदल

बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील (जाधव) यांची माहिती

by Team Satara Today | published on : 27 September 2024


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आपले जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व सर्व सामान्यांची अर्थवाहिनी म्हणून गेली ७५ वर्षे अविरतपणे कामकाज करीत आहे. बँकेच्या ग्राहकांना उत्तम व जलद सेवा मिळावी याकरिता बँकेमध्ये मंगळवार दिनांक ०३/१०/२०२४ पासून बँक नवीन सी बी एस प्रणाली (Finacle) सुरु करीत आहे. नवीन सी बी एस प्रणाली (Finacle) सुरु करणे प्रक्रिया करिता रविवार दिनांक २९/०९/२०२४ रोजी कामकाज सुरु असलेल्या बँकेच्या शाखांची वेळ सकाळी ०९.०० ते दुपारी ०४.०० वाजेपर्यंत राहणार आहे. (कॅश व्यवहार सकाळी ०९.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत) तसेच सोमवार दिनांक ३०/०९/२०२४ रोजी बँकेच्या सकाळ संध्याकाळ शाखांसह सर्व शाखांची वेळ (सोमवार- साप्ताहिक सुट्टी असलेल्या शाखा वगळून) सकाळी ०९.०० ते दुपारी ०४.०० वाजेपर्यंत राहणार आहे. ( कॅश व्यवहार सकाळी  ०९.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत). मंगळवार दिनांक ०१/१०/२०२४ व बुधवार दिनांक ०२/१०/२०२४ रोजी बँकेच्या सर्व शाखा बंद राहणार आहेत. बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व डिजिटल सेवा (CTS, NEFT/RTGS, UPI, Mobile Banking, ATM) दिनांक ३०/०९/२०२४ रोजी रात्री ०८.०० वाजेपासून दिनांक ०३/१०/२०२४ रोजी सकाळी ०६.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. तरी, बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांनी आपले बँकेशी निगडीत व्यवहार दिनांक ३०/०९/२०२४ पूर्वी करून घ्यावेत. दिनांक ०३/१०/२०२४ पासून बँकेचे दैनंदिन व्यवहार नियमितपणे सुरु राहतील. तरी, वरीलप्रमाणे बँक कामकाज बदलाची सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांनी नोंद घ्यावी. 

नवीन सी बी एस प्रणाली प्रक्रिया सुरु करणेकरिता होणाऱ्या गैरसोयीबद्दल सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष खा. नितीन जाधव (पाटील) यांनी केले आहे.

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव
पुढील बातमी
'देवरा' रिलीज होताच चाहत्यांनी केली दिवाळी साजरी 

संबंधित बातम्या