तृणधान्य महोत्सवाने महिला उद्योजिका पुढे येतील – जिल्हाधिकारी संतोष पाटील; पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचा शानदार शुभारंभ

by Team Satara Today | published on : 07 March 2026


सातारा  :  पीएमएफएमई अंतर्गत तृणधान्य महोत्सवाने महिलांना स्वावलंबी बनविणे हाच उद्देश धरून असे प्रदर्शन वारंवार भरविले जावे. या तृणधान्य महोत्सवामुळे अधिकाधिक महिला उद्योगिका पुढे याव्यात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांनी केले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या विद्यमाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना विभागीय प्रदर्शन आणि अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी अधिकाधिक लक्ष घालून एकल महिला स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रदर्शनात सहभागी झालेले ब्रँड उत्कृष्ट प्रतीचे आहेत. कृषी विभागाने अत्यंत चांगले नियोजन केले आहे.

सदर प्रदर्शन पोलिस कवायत मैदान, परांगे चौक, सातारा येथे दि. ७ ते ९ मार्च २०२६, सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सर्वांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी.

सातारा, सांगली, कोल्हापूर मधील पीएमएफएमई योजनेतील दर्जेदार उत्पादने व ब्रँड, आधुनिक प्रोसेसिंग मशिनरी उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील नवीन व्यवसाय संधी व निर्यात प्रक्रिया, अन्न प्रक्रिया उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण व स्वच्छतेच्या मानकांविषयी माहिती तसेच मिलेट्स प्रक्रिया उत्पादने व पौष्टिक पदार्थांसह बरेच काही मिळणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोकांच्या समस्या जागेवर सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध - जिल्हाधिकारी संतोष पाटील; तळमावले येथे 'महाराजस्व अभियान' समाधान शिबिर उत्साहात
पुढील बातमी
झेडपी अध्यक्षपदासाठी भाजपचा दावा - मंत्री जयकुमार गोरे, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले जातील

संबंधित बातम्या